सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पी.जी. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मिडीया तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मोबाईल जर्नालिझम हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ . मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागामार्फतऑगस्ट 2021 पासून हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत व प्रवेश प्रक्रियेसही प्रारंभ होत आहे. मास कम्युनिकेशन विभागात अशातच 1 कोटी 25 लाख रुपये खर्चून अद्यावत टीव्ही स्टुडिओ तसेच रेडिओ स्टुडिओची उभारणी करण्यात आलेली आहे .यातील सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत .’ पी .जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया’ हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येऊ शकेल . .रेडिओ आणि टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये तसेच शास्कीय क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे .
सध्याच्या काळात नागरिक पत्रकारिता ( सिटिझन जर्नालिझम) यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच विविध टेलीविजन चॅनल , यूट्यूब चॅनल, वेबपोर्टल चे वार्ताहर आता मोबाईल द्वारे पत्रकारिता करत आहेत. या क्षेत्रात कार्य करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘ सर्टिफिकेट कोर्स इन मोबाईल जर्नालिजम’ या अभ्यासक्रमाची सुरुवात विद्यापीठात केली जात आहे . या अभ्यासक्रमासाठी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे .
समाजिक साास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी सांगितले की मास कम्युनिकेशन विभागात बी. व्होक . जर्नालिजम मास कम्युनिकेशन हा बारावी नंतरचा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तसेच एम . ए . मास कम्युनिकेशन हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे . याशिवाय अँकरिंग , शॉर्टफिल्म ऍण्ड डॉक्युमेंटरी मेकिंग तसेच डिजिटल जर्नालिजम हे सहा महिने कालावधीच तीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत . या सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे .
या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ .रवींद्र चिंचोलकर, विभाग प्रमुख .मास कम्युनिकेशन ( (98600 91855 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
– . – .