‘The sole aim of journalism should be service’पत्रकारितेचे मूळ उद्दिष्ट सेवा असले पाहिजे असे .महात्मा गांधी यांनी म्हटले होते. समाजाला दिशा देणे तसेच समाजाला विकासाच्या कार्यात सहभागी करून घेणे ही वृत्तपत्राची महत्त्वाची कार्ये मानली जातात .
या अनुषंगाने भारतातील वृत्तपत्रांच्या कार्याच्या कडे पाहिले तर आपल्याला तीन टप्प्यांमध्ये याचा विचार करावा लागतो .
1 .स्वातंत्र्यपूर्व कालखंड
2 .1947 ते 1990 [ स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीचा कालखंड ]
3.1990 नंतर जागतिकीकरणानंतरचा कालखंड.
29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र कलकत्ता येथे सुरू केले. तेथून भारतातील पत्रकारितेच्या इतिहासाचा प्रारंभ होतो .जेम्स ऑगस्टस हिकी इंग्लंडमधून आलेले होते आणि इंग्रजांच्या सेवेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते मात्र नंतरच्या कालखंडात अधिकाऱ्यांशी बिनसल्यामुळे नोकरीतून बाहेर पडून त्यांनी वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला .इंग्रज भारतीयांची लूट कशी करत आहेत या संदर्भातील चित्र मांडण्याचा तसेच भारतीयांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचा प्रयत्न हिकी यांनी बेंगॉल गॅझेट या वृतपत्रातून केला .सर्वात महत्वाची बाब म्हणजे वृत्तपत्र हे इंग्रज सरकार विरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे तसेच या साधनांमुळे लोकांचा विकास घडवून आणता येतो ही वृत्तपत्र माध्यमाची ताकद भारतीयांना यांमुळे कळाली . कोलकाता, मुंबई आणि मद्रास ही इंग्रजांची तीन मुख्यालये होती. या तीन प्रांतात वृत्तपत्रे आधी सुरू झाली. कोलकत्ता मध्ये राजा राम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र सुरू केले. राजा राम मोहन राय यांना भारतीय पत्रकारितेचे जनक असे म्हणतात. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा फार मोठा आदर्श निर्माण केला .त्यामुळे पत्रकारिता समाजाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकते हे दिसून आले .एका बाजूला राजकीय लढ्यासाठी तर दुसऱ्या बाजूला सामाजिक परिवर्तनासाठी भारतातील दिग्गज नेत्यांनी त्या नंतरच्या कालखंडामध्ये वृत्तपत्रे सुरु केली. यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्. बाबासाहेब आंबेडकर ,गोपाळ गणेश आगरकर, गणेश शंकर विद्यार्थी ,लाला लाजपत राय ,दादाभाई नवरोजी ,मौलाना अबुल कलाम आजाद अशा अनेक नेत्यांचा उल्लेख करता येऊ शकेल .
भारतीय लोकांना जागे करून इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात उभे करण्याचे काम या वृत्तप त्रानी केले आणि प्रखर स्वातंत्र्यलढा भारतामध्ये निर्माण झाला. त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील ,दिनकरराव जवळकर ,श्रीपतराव शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून फार मोठे योगदान दिले आणि भारतीय जनतेला सामाजिक ççपरिवर्तनाच्या दिशेने पुढे नेण्याचे कार्य केले .
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला नव्या भारताची उभारणी करण्याचे आव्हान आपल्या देशात समोर होते .त्याच अनुषंगाने वृत्तपत्रांनी देखील नवा भारत घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले .पहिले वृत्तपत्र आयोगाने असे मत व्यक्त केले होते की वृतपत्रांनी सामाजिक आणिआर्थिक परिवर्तनाची गती वाढविण्यासाठी एक संप्रेरक म्हणून भूमिका बनवावे आणि समाजाला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचे कार्य करावे . त्यानुसार केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध योजना वृत्तपत्रांनी जनते पर्यंत पोहोचल्या तसेच विकास कार्यांमध्ये लोकांचा सहभाग घेण्याचे कार्य वृत्तपत्राने चांगल्या पद्धतीने केले .यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे की 1969 च्या कालखंडामध्ये पत्रकार बीजी वर्गीस यांनी हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून दिल्ली पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनपत जिल्ह्यातील छतेरा या गावाच्या विकासाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा . वर्गीस यांनी हिंदुस्तान टाईम्समध्ये 23 फेब्रुवारी 1969 रोजी एक सदर सुरू केले .भारतातील बहुतांश वृत्तपत्र हे केवळ शहरी विकासाकडे लक्ष देतात ग्रामीण भागाच्या विकासाकडे त्यांचे लक्ष जात नाही या भूमिकेतून वर्गीस यांनी सर्वप्रथम ग्रामीण भागातील विकासाच्या उद्देशाने छतरा या गावाच्या संदर्भात विकास विषयक लेखन करण्यास प्रारंभ केला .त्यामुळे या गावाच्या विकासाला मोठा हातभार लागला .गावालगतच्या नदीवर मोठा पूल उभारण्यात आला ,बससेवा सुरू झाली, गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू झाली, बँकेमार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खते आणि दुग्धोत्पादनासाठी जनावरे विकत घेण्यासाठी कर्ज मिळू लागले .शिलाईयंत्र तयार करणाऱ्या या कंपनीने गावातील महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप केले .छतिरा गावात विकास विषय प्रश्न मार्गी लागल्याने त्यातून प्रेरणा घेऊनत्यालगतच्या मांजरा आणि पुरवठा या दोन गावांमध्ये देखील हिंदुस्तान त्यांच्या वतीने विकास प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य हाती घेण्यात आले .माझ्या गावातील विणकरांना सहकारी संस्था स्थापन करून विणकामाचा संदर्भात वीन प्रकारची उत्पादने तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले तर बरोरा या गावांमध्ये युवक कल्याण सभेच्या सहकार्याने एक शाळा वग्रंथालय सुरु केले .1977 पर्यंत हा छतेरा गावातील प्रयोग चालला हा प्रयोग बंद झाल्यानंतर देखील गावातील ग्रामस्थांनी ग्राम विकास संस्थेची स्थापना करून गावाच्या विकासाला तसेच दुग्ध विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला विकास पत्रकारितेच्या अनुषंगाने वृत्तपत्राने हाती घेतलेला स्वातंत्र्योत्तर काळातील हा महत्वपूर्ण प्रयोग होता .
.असाच प्रयोग कर्नाटक मधील उदय वाणी या वृत्तपत्राने 1980च्या कालखंडामध्ये केला .दक्षिण कर्नाटक भागातील मणिपाल परिसरातील 10गावांची निवड करण्यात आली अतिमागास असलेल्या या दहा गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्राने सातत्याने तेथील समस्यांबाबत लेखन करण्यास प्रारंभ केला यामुळे या गावांचा गावांमध्ये सुधारणा होण्याची तसेच गावांचा विकास होण्यासाठी मोठा लाभ झाला .
भारतातील काही वृत्तपत्रांनी सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून काही योजना राबवल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे की टाइम्स ऑफ इंडिया वृत्त समूहाने 2010 साली हाती घेतलेल्या या उपक्रमाचा .युवकांनाइंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढविण्याचा उद्देश यामागे होता सहा वर्षे हा उपक्रम चांगल्या रीतीने चालविण्यात आला .
मराठी वृत्तपत्रांनी देखील सामाजिक विकासाच्या संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत .यामध्ये प्रामुख्याने दैनिक सकाळ’ने सुरू केलेल्या अॅग्रोवन या वृत्तपत्राचा उल्लेख करता येईल हे वृत्तपत्र पूर्णतः कृषी विकासासाठी समर्पित आहे . याशिवाय सकाळ वृत्तपत्र समूहाने न्यूजपेपर इन एज्युकेशन हा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविला त्याचप्रमाणे दैनिक सकाळ च्या वतीने दरवर्षी एज्यूकॉन या शीर्षकाखाली भारतातील कुलगुरूंची परिषद घेण्यात येते .महिलांच्या सक्षमीकरणासाठी तनिष्क उपक्रम सकाळ’ने हाती घेतलेला आहे .त्या चप्रमाणे युवकांसाठी YIN हे नेटवर्क सुरू केले आहे .स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, संविधाानविषयक जागृती या अनुषंगाने देखील सकाळ’ने अनेक उपक्रम राबविले आहेत .
दैनिक लोकमत देखील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक प्रदर्शने तसेच जलसंधारणाच्या संदर्भातील विविध कार्यक्रम त्याचप्रमाणे गुरु किंवा भूकंपाच्या स्थितीमध्ये नागरिकांची मदत अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवले आहेत .लोकमत वृत्तपत्र समूहाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सखीसखी मंच तयार केला आहे तसेच युवकांसाठी देखील एका स्वतंत्र निर्माण केले आहे .
इतरही मराठी वृतपत्रे कृषी विकास, शिक्षण, उद्योग पर्यावरण महिला सक्षमीकरण यासारख्या उपक्रमांसाठी
विशेष पाने उपलब्ध करून देतात
मात्र एकंदर तीन कालखंडानंतर विचार करतात असे दिसते की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतीय वृतपत्रासमोर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि सामाजिक परिवर्तन
हीच प्रमुख कार्ये होती . त्यामुळे त्या कालखंडामध्ये वृत्तपत्रांनी समर्थन पत्रकारितेच्या म्हणजे Advocacy या भूमिकेतून संपूर्ण क्षमतेने पाठपुरावा केला आणि देशाच्या राजकीय -सामाजिक -आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले . स्वातंत्र्य उत्तर कालखंडातही 1990 पर्यंत वृत्तपत्रांनी देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली आणि देश उभारणीमध्ये आपलाही काही सहभाग असायला हवा या भूमिकेतून नागरिकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली . तसेच विकास कार्यांमध्ये लोकांनी सहभागी करून घेण्याचे कार्य केले . 1990 नंतरच्या कालखंडामध्ये मात्र परिस्थिती बदललेली आहे 1990 मध्ये भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला यानंतर सर्व क्षेत्रे सर्वांसाठी खुली झाली . या नंतरच्या कालखंडामध्ये वृत्तपत्रांमध्ये भांडवली विकासाला महत्त्व आले मोठ्या प्रमाणात कावसायिक स्पर्धा सुरु झाली . यामुळे वृत्तपत्रांनी जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये बातम्या देण्याचे प्राधान्यक्रम बदलल्याचे चित्र आपल्याला दिसते .या कालखंडात प्रामुख्याने क्रिकेट -क्राइम आणि सेलिब्रिटी या तीन विषयांना वृत्तपत्र अधिक महत्त्व देत असल्याचे चित्र दिसते .भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण आणि शहरी विकासाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न मांडण्यासाठी मात्र काही अपवाद वगळता वृत्तपत्रे फारसे लक्ष देत नाही असे चित्र निर्माण झालेले आहे