News Updates

 शेतकऱ्याचा मुलगा विठ्ठलची थेट हॉलीवूड मध्ये धडक

बार्शी - जिद्द, कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर बार्शी तालुक्यातील पानगाव गावातील शेतकऱ्याचा मुलगा विठ्ठल काळे याने तुकाराम, सैराट, निळकंठ मास्तर अशा अनेक कित्येक मराठी चित्रपटात काम केल्यानंतर आता थेट हॉलीवूड मध्ये एन्ट्री मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध दिग्दर्शक अथोनी दिग्दर्शित 'हॉटेल मुंबई 'या चित्रपटात काम करत विठ्ठल काळेने सोलापूरचे नाव सात समुद्रापार  पोहचवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झलेले असून लवकरच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

      सोलापुरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना युवा महोत्सवत अभिनयाच्या जोरावर महोत्सव गाजवणारा पुढे पुण्यात एम ए ( इंग्रजी ) व पत्रकारितेचे शिक्षण घेऊन लघुपटाच्या माध्यमातून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरवात केली सोलपुर ची नगरी तशी सांस्कृतिक व कलाकारांची नागरी मानली जाते. या नगरीत कित्येक कलाकार घडले जब्बार पटेल, अतुल कुलकर्णी , राहुल सोलापूरकर, प्राजक्ता माळी, नागराज मंजुळे यांनी मराठी हिंदी चित्रपटात आपले स्वतःचे स्थान  निर्माण केले आहे. यानंतर सोलापूरचा तरुण चेहेरा विठ्ठल काळे याने मेहेनातीच्या व स्वतःच्या हिमतीवर मराठी चित्रपटा नंतर थेट हॉलीवूडच्या 'हॉटेल मुंबई' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळवलेली आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. 

          विठ्ठल काळेचे शिक्षण बार्शीच्या पानगाव शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यला काळेची आवड होती त्यामुळे शाळेत असताना नाटकात अभिनय एकपात्री करायचा त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालयात झाले. पदवीचे शिक्षणानंतर  विठ्ठलने  थेट पुणे गाठले. पुणे विद्यापीठात पद्वुत्तर शिक्षण पूर्ण करत असताना शोर्ट फिल्म मध्ये अभिनयास सुरवात केली शॉर्ट फिल्म करत असताना तो मराठी चित्रपटासाठी ऑडीशन द्यायचा. कित्येक ऑडीशन दिल्यानंतर त्याच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि तुकाराम या मराठी चित्रपटात कसदार अभिनय करून सर्वांचेच मने जिंकले. प्रयत्न आणि मेहेनातीच्या जोरावर विठल काळे याने आपल्या कारकिर्दीत १०५ लघुपटांमध्ये आणि 9 मराठी चित्रपटात अभिनय केल्यानंतर हॉलीवूडच्या हॉटेल मुंबईया चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 

            ऑट्रेलियन दिग्दर्शक अथोनी याचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाची निर्मिती थंडर रोड पीचेर्स या अमेरिकन संस्थेने केली आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून चित्रपटाचे छायाचित्रीकरण निक म्यानथू यांनी केले आहे स्लमडॉग मेलेनियार फेम डेव पटेल यांच्यासोबत या चित्रपटात विठलची पोलिस इन्स्पेक्टर म्हणून महत्वाची भूमिका आहे. चित्रपटात अनुपम खेर, टिल्डा, आर्मी हॉमर, नाजनीन बोनियादीट अशा अनेक कलावंतानी भूमिका साकारली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलीयात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झले असून जगभरात हा चित्रपट प्रदर्शित  होणार आहे. बार्शी सारख्या छोट्या खेड्यातून आलेला हा तरुण मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने त्याने सोलापूरचे नाव  सातासमुद्रापार पोहोचवले आहे. 

Related News