आर्किडच्या विदयार्थ्यांनी बनविले शेतक-यांसाठी उपयोगी उपकरण
कृषी प्रदर्शनात शेतक-यांचा चांगला प्रतिसाद
सोलापूर - येथील एन. के.ऑर्किड इंजिनिअरच्या विद्यार्थ्यानी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार नियंत्रित राहण्यासाठी कॅपँसीटर बँक बनविले आहे. हे उपकरण सोलापुरात होम मैदान येथे आयोजित कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने पाच दिवशीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातून शिकवता ऑर्किड कॉलेजने त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे या हेतूने प्रोजेक्ट सेक्शन मध्ये शेतकऱ्यांसाठी काही करता येते का याचा विचार करून विदयुत वाहकाला नियंत्रित करण्यासाठी कॅपँसीटर बँक बनविण्यात या विद्यार्थ्यांना यश आले आहे. ऑर्किड इंजिनिअरच्या दर्शन महिंद्रकर, अक्षय पाध्ये , अस्लम शेख , अमर मिठ्ठा या विद्यार्थ्यांनी हे उपकरण २ ऑक्टोबर २०१७ रोजी बनविले आहे यासाठी त्यांना इरफान मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले. कॅपँसीटर बँकाची किमंत २ के .व्ही .ए.आर साठी ६०० रुपये तर ३ के .व्ही .ए.आर साठी ९०० पर्यत आहे. ना नफा ना तोटा हेतूवर शेतक-यांसाठी बनविण्यात आले आहे .प्रारंभी शेतकरी वर्ग हे कॅपँसीटर बँक बसविण्यात नकार दिल्यामुळे ते योग्य आहे की नाही याची माहिती कळात नव्हती परंतु याची चाचणी केल्यास ते चांगल्या दर्जाचे असल्याची माहिती मिळाली त्यामुळे ८० कॅपँसीटर बँक शेतक-यांना मोफत बसवून देण्यात आले आहे.