News Updates

सिंहगड अभियांत्रिकीत विविध प्रकल्प सादर

सोलापूर -    येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोग 2018 मध्ये अभियांत्रिकीचे विविध प्रकल्प सादर करण्यात आले.आत्मा प्रकल्पाचे संचालक व्ही.एस.बरबडे यावेळी प्रमुख अथिथी म्ह्णून उपस्थित होते ते म्हणाले की .अभियांत्रिकी प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, विविध तांत्रिक आविष्कारातून अदयावत बदल घडावेत आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून कामे यांत्रिकीकरणाव्दारे सुकर व्हावीत. यावेळी संस्थेचे सचिव संजय नवले, प्राचार्य डॉ शंकर नवले, प्रा डॉ एस एच पवार, प्रा विनय जोकारे, प्रा ऋषिकेश चाबुकस्वार आदी उपस्थित होते 

       पुढे बोलताना बरबडे म्हणाले की, शेतीच्या क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संशोधनाची मोठी संधी आहे त्यामुळे सोलर पॉवर प्रोजेक्ट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आदी दुर्लक्षित विषयांकडे विदयार्थ्यांनी वळले पाहिजे. यावेळी डॉ. एस. एच. पवार यांनी संशोधन क्षेत्रातील संधी आणि संशोधनाची व्याप्ती या विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये गो-कार्ट कार, सोलार कार, दूध कॅन्ड वॉशिंग मशीन, मुद्रा परीक्षणाचे यंत्र, शेतीचे हवाई सर्वे करण्यासाठी विशेष ड्रोन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. सर्वोत्कृष्ठ प्रकल्पांना पारितोषिक देण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली जंगम, अथर्व कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी ओंकार देगांवकर, प्रियंका मडोळे, नागेश आहेरवाडी, प्रथमेश साळुंखे, शकीर खान यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रा. जोकारे यांनी मानले

Attachments area

Related News