News Updates

एम.एड. अभ्यासक्रम पुनर्रचनेवर  कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविदयालयात कार्यशाळा संपन्न

सोलापूर -सोलापूर विदयापीठ आणि  कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन ऍण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विदयमाने २१ एप्रिल 2018 रोजी कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविदयालय  येथे विदयापीठस्तरीय एम.एड. अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते..

महाविदयालयाचे प्राचार्य डॉ शिवकुमार एस  गणापूर यांनी सांग्‍2तले की .या कार्यशाळेत शिक्षण्शास्त्र विदयाशाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे सदस्य, एम.एड. अभ्यासक्रमाचे प्राचार्य आणि अध्यापक तसेच विदयापीठाशी संलग्नित बी.एड. महाविदयालयांचे प्राचार्य, विदयार्थ्यांचे प्रतिनिधी इत्यादींनी सहभाग घेतला.. अभ्यासक्रमात कोणते व कसे बदल करावेत याबाबत अनेकंनी  मते मांडली व महत्वपूर्ण चर्चा झाली.     

कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनचे समन्वयक डॉ आश्विन बोंदार्डे , उप समन्वयक डॉ विजयकुमार जोकारे आणि संचालक प्राचार्य डॉ शिवकुमार एस  गणापूर यांनी  तसेच महाविदयालयातील अध्यापकांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासठी परिश्रम घेतले.

 

Related News