News Updates

उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यास एन.पी.टी.इ.एल. उपयुक्त – प्रा. त्यागराज

सोलापूर –  उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्सड लर्निंग ( एन.पी.टी.इ.एल.) चे अभ्यासक्रम खूप उपयुक्त हेत असे मत आय.आय.टी. मद्रासचे प्रा. अँड्यू त्यागराज यांनी व्यक्त केले. आय.आय.टी. मद्रास, आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय , सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 एप्रिल 2018 रोजी वालचंद अभियांत्रिकी महाविदयालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बीजभाषण करताना प्रा. त्यागराजन बोलत होते.

या कार्यशाळेचे उदघाटन्‍ प्रा. त्यागराजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर आय.आय.टी. मद्रासच्या बालाजी भारती, वालचंद अभियांत्रिकीचे प्राचार्य एस.ए. हलकुडे, कार्यशाळा समन्वयक विपुल कोंडेकर , प्रा. आर.आर.दुबे, सोलापूर विदयापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विदयाशाखेचे प्रभारी अधिष्ठाता एस.आर. गेंगजे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रा.त्यागराज म्हणाले की एन.पी.टी.इ.एल. हा भारतातील विविध आय.आय..टी. संस्थांनी हाती घेतलेला उपक्रम आहे. यात आय.आय.टी. मद्रासने विविध अभ्यासक्रम तयार केले आहेत. अभियांत्रिकी , विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांना ज्ञान व गुणवत्ता वाढविण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. यात नवनवीन विषयांचे व्हिडीओ लेक्चर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतात. विदयार्थी हे व्हिडीओ हवे तेव्हा हवे तेव्हा पाहू शकतात व हे विषय स्वतः शिकू शकतात. हे अभ्याक्रम पूर्न केल्यावर सोलापूर विदयापीठाच्या विदयार्थ्यांना क्रेडिट मिळू शकतात.

दुपारच्या सत्रात भारती बालाजी यांनीही एन.पी.टी.इ.एल. व्दारा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या संदर्भात माहिती दिली.त्यांनी सांग्‍ाितले की आम्ही तीन प्रकारचे अभ्याक्रम चालवतो. त्यात काही नवीन अभ्यासक्रम ााहेत , काही पुन्हा चालविले जाणारे अभ्यसक्रम आहेत.

प्राचार्य हलकुडे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की , मंदीमुळे मागील दोन दशकात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. भारतात उच्च शिक्षण क्षेत्रात निष्णात अध्यापकांची कमतरता आहे. अशा काळात कमी खर्चात विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास एन.पी.टी.इ.एल. ची मदत होऊ शकते.

प्रारंभी प्रा.विपुल कोंडेकर यांनी कार्यशाळेच्या योजनाचा हेतु स्पष्ट करताना सांगितले की, एन.पी.टी.इ.एल. तर्फे उपलब्ध असणाऱ्या विविध कोर्सेस ची माहिती अभियांत्रिकी विज्ञान व्यवस्थापन महाविदयालयाच्या प्राचार्य वरिष्ठ शिक्षकांना कळावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.प्रा. आर.आर.दुबे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. या कार्यशाळेस महाराष्ट्रतील तसेच बाहेरच्या राज्यातील अध्यापक उपस्थित होते.

Related News