News Updates

पत्रकारांनी समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडावेत

सोलापूर : सोलापूरच्या पत्रकारितेला खूप मोठा वारसा आहे, ज्येष्ठ पत्रकार कै. रंगाअण्णा वैद्य ,बाबुराव जककल यांनी मोठे योगदान दिले आहे .पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनच समाजाचे दुःख वेदना मांडल्या आताच्या.पत्रकारांनी निर्भीडपणे समाजाचे प्रश्न मांडावेत अशी अपेक्षा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केली.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ रा .सु. गवई सोशल फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वार्तांकन स्पर्धेतील विजेत्यांना आज पत्रकार संघाच्या कार्यालयात सरवदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होत.या कार्यक्रमास रिपाईच्या गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोड,पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. साई निकंबे ,राजकुमार सोनवणे हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी सरवदे म्हणाले ,पत्रकार हे समाजातील चांगल्या वाईट घटना समाजासमोर आणत असतात. पत्रकारा एवढेच छायाचित्रकारांची ही काम मोठे आहे. असेही ते म्हणाले .स्पर्धेतील विजेते प्रथम  संताजी शिंदे ,भरतकुमार मोरे द्वितीय किरण बनसोडे, अमोल सीताफळे तर तृतीय क्रमांक रमेश पवार, रामेश्वर विभूते यांना उत्कृष्ट  वाताॕंकणाचा तर छायाचित्र स्पर्धेत प्रथम  संदीप वाडेकर, द्वितीय  नितीन कटके तृतीय मिलींद राऊळ तर उत्तेजनाथॕ पुरस्कार सुहास राऊळ यांना देण्यात आला .उत्कृष्ट छायाचित्रण चा पुरस्कार विशाल गंगणे यांना देण्यात आला आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले ,तर आभार राजकुमार सोनवणे यांनी मानले. प्रदेशाध्यक्ष वाघमोडे म्हणाले, गवई फाउंडेशन व श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला  जात आहे यापुढच्या काळातही हा उपक्रम सुरू ठेवले जातील असा शब्द त्यांनी दिला.

Related News