News Updates

माध्यमांनी जनतेच्या खऱ्या प्रश्नाकडे लक्ष दयावे - पद्मभूषण देशपांडे

सोलापूर- सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक  प्रश्नांना अधिक महत्व देत आहेत,  त्याऐवजी  माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नांकडे अधिक लक्ष दयायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

 

सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात ‘समाजाचे प्रश्न आणि प्रसार माध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस प्रमुख वक्ते ते बोलत होते.मंचावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. इ .एन. अशोककुमार होते.

      पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की , आजचे युग हे वेगवान युग  आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल , त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे.

                     दत्ता बाळसराफ म्हणाले की, एकेकाळी संगणक नेकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या सव्‍च स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाहय झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दत्ता गायकवाड म्हणाले की , जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्वज्ञानासारख्या अनेक महत्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज्‍ आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोककुमार म्हणाले की, माध्यमे बदलत असताना , त्यांनी जनतेला  योग्य मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेपासून दूर जाता कामा नये.

                 कार्यकमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवं महाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक निलेश राऊत, यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा अंबादास भासके, प्रा मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे तसेच  विदयार्थी आदि उपस्थित होते.

 

Related News