News Updates

कृषी विकासातील माध्यमांच्या भूमिकेवर चर्चासत्र

बीड- बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविदयालयाने 10 व 11 मार्च 2018 रोजी ' कृषी विकासातील माध्यमांची भूमिका या विषयावरील राज्य स्तरावरील चर्चासत्रााचे आयोजन केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या अनुदानातून या चर्चासत्रााचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्राात संशोधक विदयार्थ्यांनी शोधनिबंध सादर करावेत ासे आवाहन प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी केले आहे. यात  5 मार्च 2018 पर्यंत शोधनिबंध मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सदर शोधनिबंध vasantraokalecollegebeed2006@gmail.com या इमेलवर पाठवावेत असे आवाहन करन्यात आले आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी अद्यापकांना 500रुपये तर विदयार्थ्यांना 300 रुपये नोंदणी शुल्क आहे. या चर्चासत्रासाठी  कृषी पत्रकारिता आणि त्याचा विकास यातील नवे प्रवाह, माध्यमे आणि कृषी विकासासंबंधी जागृती, समाज माध्यमे आणि शेतकरी संज्ञापन , मुद्रित माद्यमे आणि कृषी विकास, कृषी विकासात नभोवाणी आणि दूरचित्रवाणीची भूमिका, कृषी विकासातील नवतंत्रज्ञान , कृषी विकासासाठी वेब माद्यमे हे विषय ठेवन्यात आले आहेत. अधिक माहितीसाटी सहायक प्राध्यापक विजय दहीवाल ( 8275941655) अथवा सहायक प्राध्यापक सुरेश कसबे ( 9561817474 )यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करन्यात आले आहे.

 

 

Related News