News Updates

• राजा ढाले यांच्या हस्ते

सोलापूर -डॉ.बाळासाहेब मागाडे संपादित व थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर प्रकाशित "समग्र बाबासाहेब" या ग्रंथाचे "अॅमेझाॅन" या सुप्रसिद्ध प्लॅटफाॅर्मवर राजा ढाले यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. याचवेळी थिंक टँक ई-मासिकाच्या "युगनायक" या जयंती ई-विशेषांकांचे वाचकार्पण करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत योगीराज वाघमारे उपस्थित होते. 

 थिंक टँक पब्लिकेशन्सने मागील चार वर्षांपासून साहित्य क्षेत्रात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. "समग्र बाबासाहेब" हा हार्डबाऊंड स्वरुपातील महाग्रंथ या प्रवासातील मैलाचा दगड ठरला आहे. या ग्रंथाला राज्यभरातच नव्हे तर देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. पहिली आवृत्ती अवघ्या वर्षभरात संपली. दूसरी अद्ययावत आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली असून हा सुप्रसिद्ध ग्रंथ आता"अॅमेझाॅन" प्लॅटफाॅर्मवरुन देशभरातील वाचकांना खरेदी करता येणार अाहे.बाळासाहेब मागाडे यांनी थिंक टँक पब्लिकेशनच्या  माध्यमातून मागील चार वर्षात ानेक महत्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले आहेत. समग्र बाबासाहेब हा या प्रकाशनाचा ऍमेझॉनवर उपलब्ध झालेला पहिला ग्रंथ आहे. या निमित्ताने प्रकाशनालाही वैश्विक अधिष्ठान लाभले आहे ही मह्त्वाची बाब आहे.

आंबेडकरी चळवळीतील झुंजार कार्यकर्ते राजा ढाले यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचा आरंभ झाला,

Related News